बेस्टच्या ताफ्यात स्पेशल ‘तेजस्विनी’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईच्या गर्दीत महिलांना सोयीच्या ठरतील अशा स्पेशल ‘तेजस्विनी’ मिडी बसेसचा लवकरच बेस्टच्या ताफ्यात समावेश होणार आहे. या बसेस खास महिलांसाठी राखीव असणार असून त्यांना वेगळा रंग असणार आहे. अशा 37 बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली आहे. या मिडी बसेस नॉन एसी डिझेलवर धावणार असून व्ही. ई. कमर्शियल व्हेईकल लिमिटेड कंपनी त्या पुरविणार आहे. 37 बसेसपैकी पहिली मिडी बस 45 दिवसांत मिळणार असून उर्वरित बस साडेचार महिन्यांच्या कालावधीत मिळणार आहेत.