रडार बंद पडल्याचं लक्षात येताच चीनला जाणारं कार्गो विमान कोलकात्याला परतलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 जुलै रोजी स्पाईसजेटला एका तांत्रिक अडचणीचा फटका बसला. चीनला जाणाऱ्या विमानातील हवामान रडारमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे.

मंगळवार, 5 जुलै रोजी, स्पाइसजेटचे बोईंग 737 कार्गो (मालवाहू विमान) कोलकाता ते चोंगक्विंगला जाणार होते. उड्डाणानंतर, हवामान रडारने काम करणं बंद केलं, त्यानंतर प्रभारी पायलटनं कोलकाता येथे परतण्याचा निर्णय घेतला. विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरलं, असं स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं.

याआधी मंगळवारी, स्पाइसजेटच्या विमानाने पाकिस्तानच्या कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिकेटर लाइट बिघडल्यानंतर ‘लँडिंग’ केलं होतं. दिल्ली ते दुबईला जाणारं विमान कराची विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं, असं स्पाइसजेटनं सांगितलं.