स्पाइस जेटच्या वैमानिकाने एटीसीच्या परवानगीशिवाय केले उड्डाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पाइस जेटच्या वैमानिकाने गुजरातमधील राजकोट येथून 30 डिसेंबर रोजी एअर ट्रफिक पंट्रोल (एटीसी) च्या परवानगीशिवाय उड्डाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विमानाचे इंजिन सुरू करण्यापासून उड्डाण करेपर्यंत वैमानिकाने एटीसीकडून अनेक परवानग्या घेणे बंधनकारक आहे. मात्र स्पाइस जेटच्या वैमानिकाने सदरची परवानगी न घेताच सकाळी 9.30 वाजता राजकोट विमानतळावरून उड्डाण करत 11.15 वाजता दिल्लीत लँडिंग केले होते. या प्रकरणाची एटीएसने गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, परवानगी न घेता केलेल्या उड्डाणामुळे अपघात होण्याची शक्यता असते.