स्पायडरमॅनला स्टंट पडला महागात

 

दिल्लीच्या रस्त्यावर बाईकवरून स्टंट करणे स्पायडरमॅनला महागात पडले. स्टंट करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यात एक मुलगा आणि एका तरुणीचा समावेश आहे. हे दोघेही रील बनवण्यासाठी बाईकवरून स्टंट करत होते. या दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यांच्या बाईकला नंबर प्लेट नव्हते. तसेच आरसेसुद्धा नव्हते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्ससुद्धा नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले.