काळाचौकीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस. जी. फाउंडेशनच्यावतीने व सर जे. जे. रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने काळाचौकीच्या अमरदीप येथील पटांगणात नुकतेच रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 103 बाटल्या रक्त जमा झाले. संदेश गावकर व डॉ. सुमिध लहाने यांच्या नेतृत्वाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. समाजसेवक डॉ. प्रागजी वाजा यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. श्रीकृष्ण हरचादे, अभिजित चासकर, नयन सावंत, विनायक तेलकर, श्रद्धा गावकर, संदीप वारीक, प्रसाद मोरे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.