सिग्माच्या मोफत सैन्य भरती शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

६ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणा-या सैन्य भरतीचा लाभ जिल्ह्यातील उमेदवारांना घेता यावा यासाठी सिग्मा करिअर अॅकॅडमी सिंधुदुर्ग मार्फत वर्दे येथे घेण्यात आलेल्या मोफत सैन्य भरती मार्गदर्शन शिबिरास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सैन्य भरतीचा पुरेपूर लाभ उमेदवारांना व्हावा व या भरती मध्ये जिल्ह्यातील उमेदवार मोठ्या संख्येने भरती व्हावेत म्हणून उपस्थित उमेदवारांना संपूर्ण आर्मी भरती प्रक्रिया याचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत या शिबिरामध्ये आर्मी भरतीची ऑनलाईन प्रक्रिया, १६०० मीटर रनिंग -ट्रॅक्स, मेडिकल टेस्ट याबाबत मार्गदर्शन आर्मी भरती तज्ञ व सिग्मा अध्यक्ष एस जी ठाकूर यांसकडून तर लेखी परीक्षा यामध्ये मागील सर्व पेपर विश्लेषण, त्यासाठी आवश्यक संदर्भ साधने अभ्यास पद्धती याबाबत मार्गदर्शन सिग्मा संचालक प्राचार्य एस. जी.लोखंडे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी आर्मी भरतीचे ऑनलाइन फॉर्म प्रक्रिया सुरू झाली असून ती 22 नोव्हेंबर ही त्याची शेवटची दिनांक आहे यासाठी उमेदवारांनी आपली ऑनलाईन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे सिग्मा उपाध्यक्ष एस. व्ही. भोगले यांनी सांगितले.

संचालकीय अध्यक्ष एस.जी.ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. आर्मी भरतीस जाणार्‍या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी सिग्मा अॅकॅडमी मार्फत जाण्या येण्याची, तेथे राहणे व जेवण व्यवस्था यासाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या सुविधेसाठी इच्छुक असतील त्यांनी 9850845094 येथे संपर्क साधावा. या सुविधेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेवून असलेल्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सिग्माच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.