
2013 सालामध्ये आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉटफिक्सिंगमध्ये सापडल्यामुळे बंदीची शिक्षा भोगत असलेल्या शांतापुमारन श्रीशांत याने रविवारी सुटकेचा निःश्वास सोडला. कारण आता त्याची बंदीची शिक्षा पूर्ण झाली आहे. याप्रसंगी तो म्हणाला, आज मी स्वतंत्र झालो. आता माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत. ज्या खेळावर अतोनात प्रेम केले, त्या खेळाच्या दिशेने पुन्हा वळू शकतो. आणखी पाच ते सात वर्षे क्रिकेट खेळू शकतो. या कालावधीत कोणत्याही संघासाठी खेळताना सर्वस्व पणाला लावीन असे तो पुढे स्पष्टपणे म्हणाला.
I’m completely free of any charges nd anything nd now gonna represent the sport I love the most.will give my very best to every ball I ball even it’s just practice.just have another 5 to 7 years max to give it all I’ve got nd I will give the very best to any team I play
— Sreesanth (@sreesanth36) September 10, 2020
श्रीशांत पुढे म्हणाला, गेल्या वर्षी मे महिन्यात क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली. क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होत होतो, पण कोरोनामुळे या वर्षी स्थानिक मोसम होणार नसल्याचे समजले. यामुळे प्रचंड दुःखी झालो. क्रिकेट सोडण्याचा निर्णयही घेतला, पण क्रिकेट खेळण्यासाठी मी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल यामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला नाही.
I will give my very best to every ball I ball even it’s just practice..I just have another 5 to 7 years max to give it all I’ve got nd I will give the very best to any team I play for and share my humble experiences..
— Sreesanth (@sreesanth36) September 10, 2020
कोचीमध्ये स्थानिक स्पर्धाही आयोजित करण्याचे ठरवले होते, पण केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही स्पर्धाही खेळवण्यात येणार नाही, असेही तो पुढे म्हणाला.
I will never ever cheat cricket even when iam playing a friendly match..I don’t ball easy ones or try to loose..so pls get that right with everyone..I’m completely free of any charges nd anything nd now gonna represent the sport I love the most..I will give my very best to
— Sreesanth (@sreesanth36) September 10, 2020

























































