
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जीवनावर आधारित असलेल्या श्रीदेवी बंगलो या चित्रपटाचा दुसरा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधील काही डायलॉगमुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यात श्रीदेवीचा ज्या प्रकारे बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता ते दाखविण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा चित्रपट निर्मात्यांना दिला होता.
आता या दुसऱ्या टीझरमधील एका वादग्रस्त डायलॉगमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या टीझरमध्ये ‘सारी दुनिया तुम्हारी नंगी झिंदगी देखेगी श्रीदेवी’ असा एक डायलॉग आहे. आता हा डायलॉग ऐकल्यानंतर बोनी कपूर निर्मात्यांविरोधात नक्कीच कारवाई करतील अशी चर्चा बिटाऊन मध्ये आहे.






























































