
सामना ऑनलाईन । मुंबई
मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची सरल संगणक प्रणालीत नोंद असणे आवश्यक असून त्याच माहितीच्या आधारे परीक्षा अर्ज भरावेत, अशा सूचना शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या. दहावीचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. किंवा – येथे अर्ज करता येणार www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in






























































