मोबाईलवरून प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यास पाच वर्षे परीक्षेलाच बसता येणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून बोर्डाच्या परीक्षेदरम्यान दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाईलवरून व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. परीक्षेत होणाऱया या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कडक पावले उचलली असून मोबाईल तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱया आणि मिळविणाऱया विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसह पुढील पाच वर्षे बोर्डाच्या परीक्षांनाच बसता येणार नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांविरुद्ध सायबर लॉ अॅक्टनुसार गुन्हादेखील दाखल करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱया दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कडक सूचना जाहीर केल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी अथवा अन्य गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, याची शिक्षा सूचीच शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. त्याचबरोबर परीक्षेपूर्वी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या काळात सदर शिक्षा सूचीचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांसमोर करणे, शक्य असल्यास शिक्षा सूचीची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.

परीक्षेतील कॉपी, गैरप्रकारांना अशी असेल शिक्षा

 तोतया परीक्षार्थी परीक्षेस बसणे तसेच प्रश्नपत्रिकेची चोरी करणाऱयास पुढील पाच वर्षे परीक्षेला बसता येणार नाही.  उत्तरपत्रिकेवर निळ्या, काळ्या शाईव्यतिरिक्त अन्य शाईने लिहिल्यास संदर्भित भागास गुण मिळणार नाही  उत्तरपत्रिकेत शिवीगाळ, धमकी देणे, पह्न नंबर लिहिल्यास तसेच परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थींशी गप्पा मारल्यास चौकशीअंती विषयाची संपादणूक रद्द

सकाळ सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी साडेदहा वाजता आणि दुपार सत्रातील परीक्षेसाठी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या वेळेनंतर येणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना राज्य शिक्षण मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.