दहावी, बारावीचा निकाल नियोजित वेळेतच

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला होता. मात्र आता संप मिटल्याने पेपर तपासणीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. पेपर तपासणीला काही अंशी उशीर झाला असला तरी दहावी, बारावीचा ऑनलाइन निकाल नियोजित वेळेतच लावण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीची परीक्षा आज (21 मार्च) रोजी संपली, तर दहावीची परीक्षा 25 मार्चपर्यंत असणार आहे.