एसएससी बोर्डाला घरघर, दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 50 हजारांनी घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ssc-exam
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य शिक्षण मंडळाला म्हणजेच एस. एस. सी. बोर्डाला घरघर लागली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ही बाब समोर आली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 16 लाख 41 हजार 568 विद्यार्थी बसले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 हजारांनी कमी झाली आहे.

गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 17 लाख 51 हजार 353 इतकी होती.एका वर्षाच्या आकडेवारीवरून दहावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी कमी झाले आहेत असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

हेल्पलाइन

मुंबई – 022 – 27893756, 27881075

कोकण – 02352 – 228480

नाशिक – 0253 – 2592143

  • परीक्षा देणारे सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातील 3 लाख 76 हजार 691 असून कोकण विभागातून सर्वात कमी म्हणजेच 35 हजार 304 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदाच्या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे नव्या अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शेवटची संधी असून या परीक्षेत नापास झाल्यास पुढे त्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना परीक्षाकाळात मोबाईल वापरास बंदी आहे.
  • यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहे तर अंध, मूक, कर्णबधिर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला आहे.
  • परीक्षा वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक.
    प्रात्यक्षिक परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 23 आणि 25 मार्च रोजी परीक्षा देण्याची शेवटची संधी.
  • विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हानिहाय 2 आणि राज्यस्तरावर 10 अशा एकूण 60 समुपदेशकांची नेमणूक.
  • व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियाकर व्हायरल होणार्‍या वेळापत्रकावर विद्यार्थी, पालकांनी अवलंबून राहू नये.
  • संपूर्ण राज्यात 252 भरारी पथकांची नेमणूक.
  • यंदा 8830 दिव्यांग विद्यार्थी देणार परीक्षा.