
यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांना दहावी पास होण्याची लॉटरी लागणार आहे. या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी यांपैकी दिलेल्या शेवटच्या परीक्षेचा निकाल विभागीय शिक्षण मंडळात जमा करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी जर शेवटची पाचवीची परीक्षा दिली असेल तर पाचवीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना दहावीचे गुण मिळणार आहेत.
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर काल गुरुवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात कार्यपद्धती जाहीर केली. यात खासगी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाविषयीच्या सूचनाही दिल्या आहेत. खासगी विद्यार्थ्यांनी संपर्क पेंद्रावर सादर केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहपाठ यांच्या मूल्यमापनासोबतच या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी यांपैकी ज्या इयत्तेची अंतिम परीक्षा पूर्ण केली आहे त्या इयत्तेच्या अंतिम निकालाची प्रत विभागीय मंडळाकडे सादर करायची आहे.
शेवटच्या परीक्षेचा निकाल सादर करण्याचे शाळांसमोर आव्हान
खासगी विद्यार्थ्यांनी दिलेल्या शेवटच्या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाकडे सादर करण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. शिक्षण अर्धवट सुटलेले विद्यार्थी खासगी विद्यार्थी म्हणून दहावीचा परीक्षा अर्ज भरतात. यातील बऱयाच विद्यार्थ्यांचा पाचवी ते नववीचा वार्षिक निकाल मिळणे कठीण असल्याने या विद्यार्थ्यांचा आधीचा निकाल शोधून दहावीचा निकाल जाहीर करण्याचे आवाहन शाळा आणि शिक्षण मंडळासमोर आहे.
































































