जालन्यात मालवाहतूक करणारी एसटी अडकली नदीत, जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात यश

जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बीड डेपो आगाराची बस मालवाहतूक घेऊन जात होती. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सुखना नदीतील पूल हा सतत वाहून जातो तर त्यामुळे काही गावाचा संपर्क सुध्दा तुटतो. आज सकाळी 11 वाजता पाणी खूप जास्त ल्याने त्यात पाण्यात पूल वाहून गेला. मात्र बस चालकाला अंदाज न आल्याने बस वाहून जात होती. त्यामुळे  जेसीबीच्या सहाय्याने बस अडकून ठेवण्यात आली. कोकलांडला दोरी बांधून बस मागे ओढण्यात आली. मात्र यात कोणतेही जीवित हानी झाली नाही.

st-jcb-jalana-2

या पुलाच्या कामासाठी जेसीपी व कोकलांड जवळ होते म्हूनून बस वाचली. अन्यथा बस पाण्यात वाहून गेली असती. या नदीला तीन महिन्यापासून सतत पाणी चालू आहे तर राजूर ते पैठण हा नवीन महामार्गाचे काम आताच झाले तर सुखना नदीवरील पुलाचे काम अर्धवट झाल्याने या पुलाच्या बाजूने दुसरा मातीचा पूल तयार करण्यात आला. मात्र हा पूल नेहमी पाणी आले की वाहून जातो. या अगोदर सुध्दा या पुलावरून दोन मोटारसायकल वाहून गेल्या आहेत. या सततच्या पाण्यामुळे नदीचा  कट्टा, शेजारचे शेत जवळ जवळ पूर्ण वाहून गेले. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. या पुलाचे काम लवकर करून द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या