मोदींच्या सभेवरून विदर्भात गोंधळ, एसटी बस सेवा वेठीला; विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळमधील सभेमुळे विदर्भात गोंधळ उडाला. विविध ठिकाणांवरून सभेसाठी मोठय़ा संख्येने एसटी बसेस पाठवण्यात आल्यामुळे अनेक मार्गांवर पाच-पाच तास बसचा पत्ताच नव्हता. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून अनेक विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला. काहींचा पेपरही बुडाला. बसेसमध्ये इतकी गर्दी होती की कंडक्टरला सीट्सवरून जाऊन तिकीट काढावी लागत होती, असा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

ग्रामीण भागात एसटी बसच प्रवासाचे स्वस्त आणि मस्त साधन आहे. मात्र, मोदींच्या सभेसाठी एसटी बस सोडल्यामुळे विदर्भात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बसमध्ये  अगदी गुराढोरांसारखी माणसे काsंबून प्रवास करावा लागला. लहानगे, ज्येष्ठ नागरिक यांनाही पाय ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. अनेक ठिकाणी प्रवासी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरशी हुज्जत घालताना दिसले.

पुढच्या पाच वर्षात वेगाने विकास

आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि पुढच्या पाच वर्षांत देशाचा विकास अधिक वेगाने करेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळात विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्प प्रलंबित राहिले, असा आरोप मोदी यांनी केला.

तेरा कोटींचा मंडप

मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमधून जबरदस्ती सभेला नेले.  मंडपावर 13 कोटी खर्च तर हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी खर्च केले, असा आरोप  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

खुर्च्यांवर राहुल गांधी!

मंडपातील खुर्च्यांवर काँग्रेस  नेते राहुल गांधी यांचा फोटो असलेली स्टीकर्स लावण्यात आली होती. स्कॅन टू डोनेट असे लिहिलेल्या स्टीकर्सची आणि त्यावरील स्कॅनर कोडची चर्चा सर्वत्र रंगली. याबाबत बातम्या झळकताच तातडीने या खुर्च्या हटवण्यात आल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)