एस.टी.ची दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एस.टी.ची सरसकट 10 टक्के भाडेवाढ होणार असून ती 1 ते 20 नोव्हेंबर अशा 20 दिवसांसाठी लागू असणार आहे. मागील वर्षी याच काळात सेवेनुसार 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी केवळ 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

एस.टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवा प्रकारानुसार 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ 20 दिवसांसाठी सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.