
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, तेजप्रताप सिंह या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या एकूण 243 मतदारसंघांपैकी 121 जागांचा समावेश आहे. बिहारमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजप-जेडीयू व इंडिया आघाडीतील आरजेडी-काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होणार आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षानेही प्रचारात मुसंडी मारत निवडणुकीत रंग भरले आहेत.


























































