बाप्पाची स्वारी थेट घरी, पडद्यामागील कलाकारांना घरपोच मिळणार मूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटकाळात यंदाच्या गणेशोत्सकाला बंधनांची मर्यादा आहे. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीने यंदाच्या गणेशोत्सवात एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत मालिकांच्या सेटवरील तंत्रज्ञ आणि कामगारांच्या घरी बाप्पाची मूर्ती पोहोचवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.

यंदा बाप्पाला घरी आणायचं कसं हा प्रश्न सेटवरच्या या मंडळींना सतावत होता. आणि म्हणूनच प्रकाशझोतात न आलेल्या या खऱया हिरोंच्या चेहऱयावर आनंद फुलवण्याचा याद्वारे प्रयत्न केला आहे. नालासोपारा, चांदिवली, गोरेगाव, ठाणे आणि मुलुंड या भागात स्टार प्रवाहच्या विशेष गाडीने बाप्पाची मूर्ती पोहोचवण्यात आली.