
सामना ऑनलाईन, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली, सातारा, पुणे व अमरावती जिह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दुष्काळ निवारणाच्या कामाचा आढावा घेतला. जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीक चारा छावण्या सुरू कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य शासन दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पिण्याचे पाणी व जनाकरांच्या छावण्या ही कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाहीत अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे, टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत, जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे, सातारा जिह्यातील कायम दुष्काळी भागात उपाय योजण्यासाठी सरपंचांनी गावाचे प्रस्ताव पाठवावेत. त्यावर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा किचार करण्यात येईल. पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून त्याबाबतची कार्यवाही करावी. नादुरुस्त असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची तत्काळ दुरुस्ती करावी. तसेच ज्या पाणीपुरकठा योजना थकीत वीज देयकामुळे बंद आहेत अशा योजनांची वीज देयके भरून जिल्हा प्रशासनाने या योजना पुन्हा सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करावा असे आदेश आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
दुष्काळ आढावा बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिक एकनाथ डवले, मदत व पुनर्कसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरडय़ा पात्रातील गाळ शेतजमिनींसाठी देणार
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाक तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरडय़ा पात्रातील गाळ हा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी कापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच या बाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे, सातारा आणि सांगली जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले.





























































