पालिका स्टॉलधारकांसाठी ट्रान्सफर पॉलिसी पुन्हा सुरू करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत परवानाधारक पीच फेरीवाले आणि स्टॉलधारकांसाठी असलेली टान्सफर पॉलिसी बंद असल्यामुळे पालिकेचा कोटय़वधीचा महसूल बुडत आहे. त्यामुळे ही पॉलिसी पुन्हा सुरू करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पालिकेला करण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईतील 12 हजार पीच फेरीवाले, स्टॉलधारक, उसाचे चरखे, फिरत्या हातगाडय़ा यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, 2007 पासून अशा स्टॉलधारक, पीच फेरीवाल्यांचे खरेदी-विक्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या टान्सफर पॉलिसी (हस्तांतरण) बंद आहे. त्यामुळे ज्या पीच फेरीवाल्यांनी किंवा स्टॉलधारकांनी खरेदी केली आहे. मात्र, ही खरेदी करूनही अशा खरेदी करणाऱया स्टॉलधारकाच्या नावावर अजूनही स्टॉल झालेला नाही. अशा परिस्थितीत पालिकेने कारवाई केल्यास हा स्टॉल किंवा ती जागा जप्त करण्यात येते किंवा तोडण्यात येते. अशा प्रकारे स्टॉलधारकासह पालिकेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे अशा परवाना हस्तांतरण करणाऱया ट्रान्सफर पॉलिसीला पालिकेने परवानगी द्यावी. त्यामुळे पालिकेचा कोटय़वधीचा जो महसूल बुडत आहे, जे आर्थिक नुकसान होत आहे, ते होणार नाही आणि ट्रान्सफर पॉलिसी आल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार वाढतील. त्यामुळे बंद असलेली ट्रान्सफर पॉलिसी पुन्हा सुरू करा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विजयपुमार दळवी यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.