राज्यात 24 तासांत 11 हजार 607 कोरोनामुक्त, नव्या 14 हजार 361 जणांना झाला कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोमुक्त होणाऱया रुग्णांची संख्या आता 5 लाख 43 हजार 170 वर पोहचली आहे. आज दिवसभरात एकूण 11 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 14 हजार 361 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 331 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.

आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 39 लाख 32 हजार 522 कोरोनाच्या चाचणी पूर्ण करण्यात आल्या असून त्यापैकी 7 लाख 47 हजार 995 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला राज्यात एकूण 1 लाख 80 हजार 718 अॅक्टिव्ह केसेस असल्याचे देखील यावेळी नमूद करण्यात आले आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.62 टक्क्यांवर पोहचले असून मृत्यू दर 3.18 टक्के इतका आहे.

मुंबईत दिवसभरात 1,217 कोरोना रुग्ण; 1,241 कोरोनामुक्त, 30 जणांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात 1,217 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 1,241 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 14,818 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 562 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 19 हजार 401 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 7 लाख 43 हजार 885 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 42,099 वर पोहोचली आहे.