कोराना रुग्णांचे प्रमाण घटले, राज्यात दिवसभरात 4153 नवीन रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आज पुन्हा नवीन रुग्णांची संख्या पाच हजारांखाली आल्याने कोरोना संकटातही दिलासा मिळाला आहे.

दिवसभरात 4153 नवीन रुग्ण आढळले असून 3729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 16 लाख 54 हजार 793 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.74 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या 81 हजार 902 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात राज्यात 30 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यू दर 2.61 टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत झालेल्या 1 कोटी 2 लाख 81 हजार प्रयोगशाळा चाचण्यांपैकी 17 लाख 84 हजार 361 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यभरात पाच लाख 17 हजार 711 होम क्वॉरंटाइनमध्ये असून 6524 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.

मुंबईत दिवसभरात 800 कोरोना रुग्ण; 372 कोरोनामुक्त, 14 जणांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात 800 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 372 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत 14 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 687 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची एपूण संख्या 2 लाख 52 हजार 499वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होणाऱयांचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 233 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 10 हजार 141 इतकी आहे.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 17 लाख 85 हजार 308 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 507 वर पोहोचली आहे.