राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, 31वरून 34 टक्के महागाई भत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्के होणार आहे.

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्यांना मोफत एसटी प्रवास

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला.

वैद्यकीय उपकरणांची जीईएम पोर्टलद्वारे खरेदी

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीयविषयक उपकरणे व इतर खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्पेटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण

राज्यात येत्या शुक्रवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गोविंदा पथकातील गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. विमा कवच देण्याची गोविंदा पथकाची मागणी होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या विम्याचा हप्ता राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.