सुरेश कौलगेकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्रकारितेतील मानाचा राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ पत्रकार सुरेश कौलगेकर यांना जाहीर झाला आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगडमधील पोंभुर्ले या जन्मगावी शुक्रवार, 6 जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्र्ााr जांभेकर याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो. जांभेकर यांच्या 176 व्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी 2022 सालच्या  पुरस्कारांची घोषणा केली होती.  त्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागातून निवडक 8 पत्रकारांना दर्पण पुरस्कार जाहीर केले होते. त्यांचे वितरणही यावेळी होईल.