राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकतंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बच्चू कडू यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, “माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी,” आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

यापूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांनीही आपल्या संपर्का आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले होते.