
सामना प्रतिनिधी । अहमदाबाद
जगातील सर्वात उंच असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला पावसाचा फटका बसला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पहिल्याच पावसात गळती लागली असून मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या 153 मीटर उंचीकर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पावसाचे पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला होता. नर्मदा नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या सरदार कल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी झाले होते. सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला पहिल्याच पावसात गळती लागली. प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठय़ा प्रमाणात मनःस्ताप सहन करावा लागला.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ मध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागण्याची समस्या काही प्रमाणात आहे. प्रेक्षक गॅलरीचे डिझाईनच तसे आहे की ज्यामुळे पाणी आत येऊ शकते. हा भाग बंद केल्यास नर्मदेचे विहंगम दर्शन पर्यटकांना घेता येणे शक्य नसल्याचे नर्मदा जिह्याचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी सांगितले.
पुतळा देखभाल जबाबदारी लार्सन ऍण्ड टुब्रोकडे
प्रेक्षकांना उंचाकरून नर्मदा नदीकरील धरण पाहता यावे यासाठी ही गॅलरी बनविण्यात आली होती. लार्सन ऍण्ड टुब्रो आणि गुजरात सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. मात्र पहिल्या पावसात असा फटका बसल्याने पुतळ्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. लार्सन ऍण्ड टुब्रो यांच्याकडे या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी आहे.

























































