
सामना ऑनलाईन । इंफाळ
मणिपूरच्या एका शाळेत विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याने विद्यार्थ्यांनी शाळाच पेटवली आहे. या घटनेत शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. मणिपूरमधील काकिंगमधील ही घटना असून 25 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी ही आग लावली आहे.
Manipur: St. Joseph’s Higher Secondary School, in Kakching’s Sugnu was burnt down on 25 Apr after the school admn had taken disciplinary action against some students. Principal says, “We suspect it could be by local student orgs.They didn’t like the action against students”(26.4) pic.twitter.com/xUqDKlohO8
— ANI (@ANI) April 27, 2019
जोसेफ उच्च माध्यमिक शाळेच्या प्रशासनाने काही विद्यार्थ्यांवर कारवाई केली. त्या रागातून काही विद्यार्थ्यांनी शाळेला आग लावली. मुख्यध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम स्थानिक विद्यार्थी संघटनांचे असणार, कारण विद्यार्थ्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात ते होते. विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. विद्यार्थ्यांनी लावलेल्या आगीमुळे शाळेतील 10 खोल्या जळाल्या आहेत. तसेच दोन खोल्यांतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात खाक झाली आहेत.
सदर विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली जाईल असे मंत्री लेतपाओ हाओकिप यांनी म्हटले आहे. तसेच शाळेच्या पुर्ननिर्माणासाठी सरकारकडून सगळी मदत दिली जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसास होऊ नये असेही हाओकिप यांनी म्हटले आहे.



























































