स्वस्तात मस्त! दीड रुपयात 50 किलोमीटर; विद्यार्थ्याने बनवली सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदूषणमुक्त आणि स्वस्तात मस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाडय़ांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची हीच गरज ओळखून तामिळनाडूच्या मदुराई येथील धनुष कुमार नावाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्याने चक्क सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल तयार केली आहे. या सायकलवरून अवघ्या दीड रुपयात 50 कि.मी. अंतर कापता येते, असा दावा धनुषने केला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपार गेल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. प्रकासावर जास्त पैसे खर्च होत असल्याने अनेक जण आता इलेक्ट्रिक गाडय़ांचा पर्याय निवडतायत. धनुष कुमारने ई-सायकलसाठी 12 व्होल्टच्या 4 बॅटऱया, 350 वॅटची ब्रुश मोटर तसेच वेग कमी-जास्त करण्यासाठी एक्सिलेटर बसवले आहेत. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 20 वॅटचे 2 सोलार पॅनेल बसवले आहेत.

प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चात प्रवासासाठी ई-सायकल उत्तम पर्याय आहे. मी तयार केलेली ई-सायकल ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने धावू शकते. शहरात फिरण्यासाठी एकढा वेग पुरेसा आहे. 
– धनुष कुमार, विद्यार्थी