
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्रमांक 198 च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष विज्ञान, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, 15 जून रोजी दुपारी 2 वाजता नेहरू विज्ञान केंद्र, जिजामाता नगर, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे, प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख करून देणे आणि प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना या भेटीदरम्यान विज्ञानाचे विविध मॉडेल्स पाहता येणार आहेत, थ्रीडी शोचा थरार अनुभवता येणार आहे, तसेच विज्ञान प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. हे संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मोफत असून वयोगट 8 ते 15 वर्षांतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी मिळणार असून नवीन उपक्रम राबविण्यास त्यांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळणार आहे.
फक्त सहल नाही, तर प्रेरणादायी यात्रा
< कार्यक्रमास प्रवेश मर्यादित असल्याने उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. हा उपक्रम युवासेना सहसचिव प्रथमेश महेश बोभाटे आणि युवासेना शाखा अधिकारी नितीन शिरोडकर यांच्यामार्फत राबविण्यात येत असून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षकवर्ग यांचा यामध्ये सक्रिय सहभाग असणार आहे.
< विद्यार्थ्यांसाठी ही केवळ एक सहल नसून ही एक शैक्षणिक आणि प्रेरणादायी यात्रा ठरणार आहे. विज्ञानाच्या
माध्यमातून नव्या संधी शोधणाऱ्या आणि जिज्ञासू वृत्ती वाढवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.