कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध, रोजगार निर्मितीसाठी 500 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी काळात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, त्यामाध्यमातून कोकणातील छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.

कोकण उद्योग फोरमच्या वतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये सुभाष देसाई बोलत होते. मुंबई व परिसरात सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.

24 हजार कोटींचे सामंजस्य करार
सध्या 70 हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्याद्वारे सुमारे 16 लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेचे राज्य सरकारने काही परदेशी कंपन्यांसोबत 24 हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत असे सुभाष देसाई म्हणाले.

500 कोटींची तरतूद

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठय़ा भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. दोन्ही योजनांमध्ये केवळ 10 टक्के हिस्सा उद्योजकांचा असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्य शासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे. रायगडमध्ये एमआयडीसी याशिवाय रायगड जिह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर झाली आहे. य़ा ठिकाणी अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत. विशेषतŠ अभिनव असे फार्मा पार्क या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोकणातील पर्यंटन आणि हॉटेल व्यवसायला चालना दिली जाईल, असेही ते म्हणाले.