सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती, नवे पोलीस महासंचालक कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची अखेर सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली. केंद्रीय गृह विभागाने जयस्वाल यांच्या नियुक्तीचे आदेश आज जारी केले. आता राज्याचे पोलीस महासंचालक कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र पॅडरचे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोध जयस्वाल हे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. परंतु ते काही दिवसांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर सीआयएसएफच्या महासंचालकपदी त्यांची वर्णी लागली. आता लवकरच ते नवीन पदभार स्वीकारतील. दरम्यान, जयस्वाल यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाल्याने रिक्त होणाऱया राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे, संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नगराळे यांची महासंचालक पदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.