मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल, पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. तर दत्ता पडसलगीकर यांची महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. आज सुबोध जयस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला. सुबोध जयस्वाल या आधी ते हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत होते. दत्ता पडसलगीकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार होता. मात्र पडसलगीकर यांना पोलीस महासंचालकपद देण्यात आले आहे.

देशभर गाजलेले तेलगी प्रकरण हाताळणारे वादग्रस्त अधिकारी म्हणून जयस्वाल यांची ओळख आहे. तेलगी प्रकरणात त्यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकातही ते सहभागी होते. मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे