पालिकेत भगवा फडकवा; झटून काम करा! विभाग क्र. 2 च्या पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शासन आणि पालिकेच्या माध्यमातून भरघोस कामे केली आहेत. ती कामे जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. विरोधकांना सडेतोड उत्तरे देऊन मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी झटून काम केले पाहिजे, असे आवाहन विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी पदाधिकाऱयांना केले.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी आणि जनसंपर्क अभियान वाढविण्यासाठी नुकतेच विभाग क्र. 2 मध्ये पदाधिकारी मेळावा आणि महिलांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला विधानसभा संघटक संतोष राणे, नंदू मोरे, अनिल भोपी, प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, नगरसेविका गीता भंडारी, नगरसेवक एकनाथ हुंडारे, विधानसभा संघटक मीना कारंडे, उपविभागप्रमुख उदय रुघाणी, राजू खान, राजन निकम यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख गणेश गुरव, पैलास कणसे, दीपक मोरे यांनी केले होते.