
चाकूर तालुक्यातील सुगाव हे गाव गेल्या सहा महिन्यापासून सतत रोहित्र जळत असल्याने अंधारात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे सहा महिने उलटले तरी प्रशासनाने अद्याप खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.
प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सुगाव अंधारात आहे. तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रकातून दिला आहे.
सलग सहा महिन्यापासून गावातील भार वाढल्याने सारखे रोहित्र जळत आहेत त्यामुळे गावाचा वीजपुरवठा बंद असल्याने अद्यापपर्यंत महावितरण कोणत्याच उपाययोजना करत नाही. महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच आडमुठी भूमिका घेतात.
शेतकर्यांना, ग्रामस्थांना उरगच भाषा नेहमी वापरत असतात तसेच स्वतः कर्मचारी काम करत नसून सर्व कामे खाजगी माणसाकडून करून घेतात व ग्राहकाकडून पैशाची मागणी करतात. या सगळ्या बाबीची प्रशासनाने दखल घेऊन काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
नेहमी कर्मचारी हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गावात आघाडीत असतो. अशा प्रकारे त्यांचा भोंगळ कारभार उघडकीस येत आहे. सध्या वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अर्ध्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील पुरुष महिला जेष्ठ, वयोवृद्ध यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी फोनवर बोलणे देखील झाले आहेत परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलनचा इशारा ग्रामस्थ व सुगाव ग्रामपंचायतचे यांनी दिला आहे.
नळेगावला कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झालेले अमोल मुखेडकर यांनी दोन ते चार दिवसात सुगाव चा वीजपुरवठा व्यवस्थित होईल अशा आश्वासनाने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर सरपंच विष्णू कातपुरे, उपसरपंच अजय काळे, प्रमोद जोशी, गणपत कटाळे, मारुती बाचपले, शिवाजी धावणे, शिंदे प्रल्हाद, धोंडीराम मेकले, विजय हंडरगुळे, ज्ञानेश्वर सुरवसे, आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.





























































