ऊसतोडणी मजूराची नगरमध्ये आत्महत्या

422

बारामतीमध्ये काम करणाऱ्या ऊसतोडणी मजूराने शुक्रवारी नगरमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बापू तुकाराम पवार (वय 35, रा.अंतापुर, ता. पाटोदा ,जि.बीड) असे आत्महत्या करणाऱ्या मजूराचे नाव आहे.

नगर येथे नगर महाविद्यालयाच्या मैदानाजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .त्यांनी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. अंतापूर येथे राहणारा ऊसतोडणी मजूर बारामतीत सध्या राहत होता. त्याने नगर येथे शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे .नेमकी आत्महत्या कशामुळे केली का केली याचे कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर आर. औटी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या