लोकप्रिय अँटिव्हायरसचे निर्माते जॉन मॅकफी यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगणकाच्या अँटि व्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकफी यांनी बुधवारी स्पेनमधील बार्सिलोना तुरुंगात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. यामुळे अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. 75 वर्षीय जॉन मॅकफी हे गेल्या नऊ महिन्यांपासून तुरुंगात होते. करचोरी प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने मॅकफी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली होती. अमेरिकेत मॅकफी यांच्यावर करचोरीचा गुन्हा दाखल आहे. पण खटला सुरू होण्याआधी ते स्पेनला पळाले होते. मॅकफी यांच्या अँटिव्हायरसचे जगभरात 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. त्यांचे वकील विलाब्ला यांनी सांगितले की, स्पॅनिश न्यायालयाच्या प्रत्यार्पण मंजुरीच्या निर्णयामुळे जॉन मॅकफी गेल्या काही दिवसांपासून निराश होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यामध्ये येऊन हे टोकाचे पाऊल उचलले.