
सामना प्रतिनिधी । नगर
डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक नाराज झाले आहेत. पक्षाच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी आज दुपारी दिलीप गांधी यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांनी नगरमधून सुजय पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून शिफारस करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दिलीप गांधी समर्थक नाराज आहेत. पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा असेही त्यांनी म्हटले आहे.



























































