
जिल्ह्यात अपयश का आले याची कारणे शोधले जातील असे प्रतिपादन भाजप खासदार सुजय विखे यांनी केले आहे. तसेच परभावाचे आत्मपरीक्षण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सुजय विखे म्हणाली की नगर जिल्ह्यासोबत शिरूर, बीड, नाशिक आदी सह ग्रामीण भागांमध्ये आमचा पराभव झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण करावेच लागणार आहे. पराभव झाला याचे मला दुःख झाले आहे असेही खासदार विखे म्हणाले.
नगर जिल्ह्यातील पराभव विषयी आपल्याला अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही विचारणा केली नसल्याचे विखे यांनी सांगितले. पक्षपातळीवर समिती नेमलेली आहे तो त्यांचा अहवाल देतील. वास्तविक पाहता भाजपाने 160 जागा लढवून 105 जागा जिंकून आणल्या भाजपचा स्ट्राइक रेट हा राज्यामध्ये सर्वाधिक आहे इतरांचे काय हाल झाले हे सांगायला नको असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला.





























































