सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ.  बिंदेश्वर पाठक यांचे आज मंगळवारी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करीत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचे एम्समध्ये निधन झाले.