
होळी पेटल्यानंतर तापमानात वाढ होते. पण यंदा होळीच्या आधीपासूनच वैशाख वणवा पेटलेला आहे. अशा तापलेल्या वातवरणात लगेच त्वचा कोमेजून जाते. अशावेळी घरच्या घरी जर काही सोप्पे उपाय केले तर उन्हामुळे तुमच्या त्वचेचे रक्षण होईल.
चंदनाचा लेप: नैसर्गिक कुलर – उन्हामुळे चेहरा लाल होत असेल किंवा जळजळत असेल, तर चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून लावा. हे त्वचेला थंडावा देते आणि चेहऱ्यावरील रॅशेस कमी करते.
मुलतानी माती पॅक – ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांच्यासाठी मुलतानी माती म्हणजे वरदान! मुलतानी मातीत थोडे दही किंवा गुलाब पाणी मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील जास्तीचे तेल शोषले जाते आणि पिंपल्सचा त्रास थांबतो.
कोरफड (Aloe Vera) – रात्री झोपण्यापूर्वी फ्रेश कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. कोरफड म्हणजे निसर्गाचे सर्वात मोठे मॉइश्चरायझर आहे. यामुळे ‘सनबर्न’ झालेली त्वचा पुन्हा पूर्ववत होते.
४. टोमॅटो आणि लिंबू: टॅनिंगला करा ‘बाय-बाय’, उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळी पडली (Tanning) असेल, तर टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. नैसर्गिक ब्लीच म्हणून हे उत्तम काम करते.
५. काकडीचा थंडावा – काकडी किसून तिचा रस चेहऱ्याला लावा किंवा काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहऱ्याला हायड्रेशन मिळते.
























































