गावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या विधानाचा विपर्यास यावेळी नेटीझन्सकडून करण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामधील आयपीएल लढतीदरम्यान समालोचन करीत असताना सुनील गावसकर यांनी विराट कोहलीबाबत एक वक्तव्य केले. त्यानंतर हे विधान आक्षेपार्ह असे सांगत सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वक्तव्याचा दुहेरी अर्थ काढण्यात आला आहे.

सुनील गावसकर यांनी जे विधान केले ते आक्षेपार्ह असल्याचे सांगत सोशल मीडियावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. पण सुनील गावसकर यांनी जे विधान केले होते त्यामधील शब्दांचा खेळ करण्यात आला. सुनील गावसकरांच्या मुखी ‘इन्होने लॉकडाऊनमें तो बस अनुष्का शर्मा की गेंदो की प्रॅक्टिस की है.’ हे शब्द टाकण्यात आले. तसेच समालोचन यादीतून त्यांची हकालपट्टी करा असा सूरही यावेळी उमटला.

अनुष्काला दोषी ठरवले नाही अन् मादक वक्तव्यही केले नाही – गावसकर

अनुष्का शर्मा हिने सुनील गावसकर यांच्या वक्तव्यावर सोशल साईटवर टीका केली. यानंतर सुनील गावसकर यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला असल्याचे स्पष्ट सांगितले. यावेळी ते म्हणाले, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचा टेनिस चेंडूने क्रिकेट खेळतानाचा व्हीडीयो बघितला होता. लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने तेवढाच सराव केला. हे मी म्हणालो. याचा अर्थ अनुष्का शर्माला दोषी ठरवले होतो का? टेनिस चेंडूने टाइमपास करता क्रिकेट खेळले जाते. म्हणजे विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का शर्माला जबाबदार धरले का? तसेच मी कोणतेही मादक विधानही केलेले नाही. कुणी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला तर मी काय करू शकतो? असा सवालही पुढे त्यांनी केला.

आक्षेपार्ह विधानं केव्हा बंद होतील? -अनुष्का शर्मा

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने सुनील गावसकर यांच्या विधानावर इन्स्टाग्राम या सोशल साइटवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, पतीच्या खेळातील कामगिरीला पत्नीला कसे काय जबाबदार धरू शकता. आतापर्यंत समालोचन करताना तुम्ही इतर क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक जीवनाचा आदर केला. तोच आदर तुम्ही आम्हा दोघांना द्यायला हवा असे नाही वाटत का? माझ्या पतीच्या खेळाबद्दल बोलण्यासाठी तुमच्याकडे अनेक शब्द किंवा वाक्य असतील हे विश्वासाने सांगू शकीन. माझे नाव जोडल्यानंतर तुमच्या शब्दांना महत्त्व येणार होते का? 2020 सालामध्येही माझ्यासाठी परिस्थिती बदललेली नाहीए. मला क्रिकेटमध्ये घुसवण्याचे केव्हा थांबणार आणि आक्षेपार्ह विधानं केव्हा बंद होतील?, असा सवाल अनुष्काने विचारला आहे.

विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हा सुनील गावसकर व आवाश चोप्रा हे दोन समालोचन करीत होते. यावेळी सुनील गावसकर म्हणाले, ‘लॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का की बोलिंग पर प्रॅक्टिस की उन्होने.’ सुनील गावसकरांच्या या विधानाचा दुहेरी अर्थ काढण्यात आला.

आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही लीजंड आहात. या जंटलमन खेळामध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाते. पण तुम्हाला एवढंच सांगते की, तुमचे विधान त्रासदायक होते. तुमचे शब्द ऐकून माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या. –  अनुष्का शर्मा

आपली प्रतिक्रिया द्या