Video : रोड शो दरम्यान महिलेने केले सनी देओलला किस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरदासपूर

अभिनेता व भाजपचे गुरदासपूरमधील उमेदवार सनी देओल याच्या प्रचार रॅलीत एका महिलेने त्याच्या गाडीवर चढून त्याला किस केले आहे. या महिलेचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपने सनी देओल याला पंजाबमधील गुरुदासपूर येथून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील बाटला भागात बुधवारी संध्याकाळी एक रोडशो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोमध्ये सनी एका गाडीवर बसून प्रचार करत होता. त्यावेळी ती महिला गाडीच्या बोनेटवर चढली व तिने सनीच्या गालावर किस केले. त्यानंतर ती खाली उतरली.