सनी म्हणतेय लवकरात लवकर मुंबई गाठायची!

1525

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोनी सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत अमेरिकेत आहे. मात्र लवकरात लवकर आपल्याला मुंबईतील घरी परतायचे आहे. सध्या मी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची वाट पाहत आहे, असे नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

सनीने आपला पती डॅनियल आणि मुलांसोबत अमेरिका गाठली होती. मुलांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते. सध्या त्यांनी लॉस एंजलिस इथल्या आपल्या आलिशान बंगल्यात कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.

अमेरिकेत जाण्याच्या निर्णयावर ती म्हणाली, सध्याच्या घडीला डॅनियलची आई आणि कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचे होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे माझी मुले इथे एन्जोय करत आहेत. खरंतर त्यांना इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यात वेळ लागला होता. मुंबई सोडण्याच्या कारणास्तव मी दुःखी होते. मुंबई सोडून अजिबात अमेरिकेला जाण्याची माझी इच्छा नव्हती, असेही तिने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या