Amitabh Bachchan – महानायक अमिताभ बच्चन पुन्हा रामलल्लाच्या दर्शनाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 22 जानेवारी रोजी झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बिग बी यांनी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्यानगरीला पोहोचले आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन करतानाचा त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील काही फोटो मंदिरातीलही आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने अमिताभ बच्चन यांचे फोटो शेअर केले आहेत. बिग बी यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते रामलल्लाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे आहेत. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि वेस्ट कोटमध्ये दिसत आहेत.

बिग बी यांच्यासोबत या फोटोंमध्ये पोलीस आणि मंदिराचे पुजारीही दिसत आहेत. या फोटोमध्ये राम मंदिराचीही झलक दिसतेय. हे फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये ‘आस्था ने फिर बुलाया, और खींचे चले गये हम’, असे कॅप्शनही दिले आहे.