धक्कादायक! सर्वोच्च न्यायालयात वकिलाने सरन्यायधीशांवर शूज फेकला; म्हणाला, सनातन धर्माचा…

सर्वोच्च न्यायालयात आज एका सुनावणीदरम्यान धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने देशाचे सरन्यायधीश बीआर गवई यांच्या दिशेने शूज फेकला. सुदैवाने यात गवई यांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र न्यायालयात हजर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले व काढले. सुरक्षा रक्षकांनी वकिलाला पकडताच त्याने ”सनातन धर्माचा अपमान हा हिंदुस्थान सहन करणार नाही” अशा घोषणा दिल्या.

या घटनेनंतर सरन्यायधीशांनी सुनावणी सुरू ठेवत, अशा कुठल्याच गोष्टींचा मला फरक पडत नाही, अशा मोजक्या शब्दात सरन्यायधीशांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे.