साईबाबांना तुरुंगातच राहावे लागणार, निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून साईबाबा व त्यांच्या सहकाऱयांना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबांसह त्यांच्या सहकाऱयांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढत, त्यामध्ये त्रुटी असल्याचे म्हटले. तसेच आरोपींची मुक्तता करताना गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट केले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा. साईबाबा यांना गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.