Big Thank you! सुप्रिया सुळे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्यासाठी मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल झाला. शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘Big Thank You’ अशी पोस्टही शेअर केली आहे.

”आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले”, असे सुप्रिया सुळे यांनी फोटोसोबत ट्विट केले आहे.