पाच वर्षापूर्वीच चिदंबरम यांचं ऐकलं असतं तर… सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला फटकारले

केंद्र सरकारने GST च्या स्लॅबमध्ये बदल करत 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST चा बचत उत्सव म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून मोदी सरकारला फटकारले आहे.

माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी पाच वर्षापूर्वीच GST चे वेगवेगळे स्लॅब ठेवू नका, हे चुकीचे आहे असा सल्ला सरकारला दिला होता. मात्र तेव्हा सरकारने त्यांचे ऐकले नाही. जर तेव्हा त्यांचे ऐकले असते तर आज हा निर्णय घ्यायची गरजच पडली नसती. आम्ही या निर्णयाचे स्वागत जरी केले हे सरकारला उशीरा सुचलेले शहानपण आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.