संगीत नाटक अकादमी पुरस्कार, सुरेश वाडकर, सुहास जोशी, राजीव नाईक यांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ गायक पंडित सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, नाटककार राजीव नाईक यांना 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शनिवारी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कारांचे वितरण झाले.

संगीत, नाटय़, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल 44 कलावंतांना वर्ष 2018चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये चार कलावंतांना पैलोशिप देण्यात आली. प्रत्येकी एक लाख रुपये, ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.