
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करणारे भाजपचेच कार्यकर्ते निघाले आहेत. त्यांच्या कार्यालयात काम करणारे भाजप कार्यकर्ते सागर सोनकर आणि साहिब सोनकर यांनीच हत्येचा कट रचला होता. सीबीआयने या प्रकरणात 11 आरोपींविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच 6 मे रोजी मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रथ हे अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम पाहत होते. भवानीपूर मतदारसंघातील संपूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली होती. सीबीआयच्या तपासात, या हत्येचा कट डिसेंबर 2025पासूनच रचला जात होता, मात्र विविध कारणांमुळे हत्येची तारीख वारंवार पुढे ढकलली जात होती असे समोर आले आहे. या हत्या प्रकरणात एका प्रतिस्पर्धी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या भूमिकेचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे.


























































